आगरकर : एक आगळे चरित्र (भाग १)
‘टिळक, आगरकर, गोखले वगैरे मंडळींविषयी आतापर्यंत खूप लिहिले गेले आहे … मात्र हे लेखन कळत नकळत एकतर्फी, पूर्वग्रहदूषित होते … ज्या शिस्तीने व काटेकोरपणे व्हावयास हवे होते तसे ते झालेले दिसत नाही,” अशी डॉ. य. दि. फडके यांची तक्रार कधीपासून वाचनात आहे. अर्वाचीन महाराष्ट्राचे इतिहासकार आणि सामाजिक परिवर्तनाचे भाष्यकार म्हणून त्यांचा लौकिक विद्वन्मान्य आहे, इतकेच …